Homeजिल्हाअण्णा हजारे यांच्या उपोषणा बाबत अद्यापही प्रश्नचिन्ह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान...

अण्णा हजारे यांच्या उपोषणा बाबत अद्यापही प्रश्नचिन्ह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वत्सला नायर यांच्या भेटीनंतरही अण्णा हजारे पन्नास टक्के समाधानी

advertisement

अहमदनगर दि.१४ फेब्रुवारी
वाईन शॉपप्रमाणेच, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातही वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. या निर्णयाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याप्रकरणात उडी घेतली आहे.

१४ फेब्रुवारीपासून या निर्णयाविरुद्ध आपण उपोषणास बसणार असल्याचा निर्णय घेतल्या मुळे आज सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वत्सला नायर यांनी आज राळेगणसिद्धीमध्ये येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली तसेच वाईन विक्रीबाबत शासनाची भूमिका समजावून सांगितली सर्वच किराणा दुकानांमध्ये वाईन विक्री होणार नसून राज्यातील वाईन विक्रीबाबत धोरणामध्ये फक्त सहाशे दुकाने आज मितीला बसू शकतात मात्र त्यामध्येही अजून काही कठोर अटी घातल्या नंतरच विक्रीला परवानगी देणार असल्याने या दुकानांची संख्याही कमी होणार असल्याचं त्यांनी अण्णा हजारे यांना सांगितले आहे.


या चर्चेनंतर अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की वत्सला नायर यांच्या बरोबर केलेल्या चर्चेनंतर आपण पन्नास टक्के समाधानी झालो आहोत मात्र आता ग्रामसभेचा निर्णय आणि राज्यातील विविध शहरांमध्ये जे कार्यकर्ते आहे त्यांच्याशी संवाद साधून आपण पुढील निर्णय घेणार असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केल आहे त्यामुळे अद्यापही अण्णा हजारे यांच्या उपोषणावर प्रश्नचिन्ह आहे.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular