अहमदनगर दि २४ फेब्रुवारी
बनावट लेटरहेडचा वापर करून, त्यावर बनावट सही-शिक्का मारून महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेची पाच कोटी एक लाख ८४ हजार ६१४ रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मंडलअधिकारी मंडलाधिकारी जगन्नाथ धसाळ,नागापूरचे तलाठी संदीप तरटे ,यांच्यासह.मवाळ इन्फास्ट्रक्चरचे भागीदार अशोक मवाळ, पंकज मवाळ,भरत मवाळ व मृदुल मवाळ यांच्याविरोधात महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी सागर अंबिका प्रसाद यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एवढा मोठा गंभीर गुन्हा दाखल होऊनही अद्यापपर्यंत मंडळ अधिकारी जगन्नाथ ढसाळ त्याच खुर्चीवर ठाण मांडून बसल्याने गरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुंपणच शेत खात असेल तर तक्रार करायची कोणाकडे असाच काहीसा प्रकार या ठिकाणी दिसून येतोय त्याच प्रकारे सावडी तलाठी कार्यालय मध्ये हा सर्व गंभीर प्रकार घडूनही या ठिकाणी एक वराडे नावाचा खाजगी इसम अजूनही कार्यरत आहे.आपल्यामागे फार मोठ्या लोकांचे हात असून आपणास कोण तलाठी कार्यालयातून बाहेर काढतो ते पाहू असे आव्हानच तो नागरिकांना देत असतो.
महसूल खाते अशा अधिकारांवर मेहरबान का याबाबत आश्चर्य व्यक्त केले जातय याबाबत आता काही सामाजिक संघटना आवाज उठवणार असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन ढसाळ आणि तरटे यांची बदली करण्याबाबत मागणी करणार आहेत तसेच सावेडी तलाठी कार्यालयातील वराडे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करणार आहेत.





