मुंबई दि.२९ ऑगस्ट
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पोलिसांच्या घराबाबत सर्वात मोठी योजना तयार करण्याच काम सध्या सुरू आहे. पोलिसांच्या घरासाठी राज्य सरकारने नवी योजना आणली आहे. पोलिसांच्या घरासाठी राज्य सरकार तीन टप्प्यात आराखडा तयार करून पोलिसांना घर देणार आहे.
मुंबईत स्वस्तात घर मिळण्याचे पोलिसांचे (Mumbai Police) स्वप्न अखेर साकार होण्याच्या मार्गावर आहे. कारण शिंदे सरकाराने गणेशोत्सवात(Ganeshotsav)
राज्यातील पोलिसांनी खुशखबर दिली आहे. पोलिसांना हक्काचं घर मिळावे यासाठी राज्य सरकारची नवी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत म्हाडा झोपडपट्टी(Slum) पुनर्विकास, समूह विकास या योजनांमध्ये 25% घर पोलीस दलासाठी राज्य सरकार आरक्षित करणार आहे.
पोलिसांसाठी आरक्षित असलेल्या शासकीय/खाजगी जमिनीवरील विकास करून त्यातून पोलिसांना सेवा निवासस्थाने उपलब्ध करून देणार आहे. म्हाडा(Mhada) झोपडपट्टी पुनर्विकास समूह विकास योजना अशा सर्व प्रकल्पामध्ये 25% घर पोलीस (police)दलासाठी आरक्षित करण्यात येणार आहे.