Homeक्राईमकुंपणच शेत खात होते....लाचलुचपत विभागातील महिला पोलीस निरीक्षकाला लाच प्रकरणी अटक

कुंपणच शेत खात होते….लाचलुचपत विभागातील महिला पोलीस निरीक्षकाला लाच प्रकरणी अटक

advertisement

नांदेड दि.२९ नोव्हेंबर-
भ्रष्टाचारावर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातच कसा भ्रष्टाचार चालतो याचे उदाहरण नांदेड मध्ये समोर आले आहे.
गेल्या वर्षभरापासून नांदेडच्या एसीबी येथे कार्यरत असणाऱ्या पोलिस निरीक्षक मीरा बकाल त्यांच्यावर भ्रष्टाचाराला आळा घालण्याची जबाबदारी असताना त्यांनीच तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी केली.


तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन मध्यस्थामार्फत लाच मागणी करणाऱ्या महिला पोलिस निरीक्षकाला एसीबीनेच पकडले आहे. मीना बकाल असे या निरीक्षकाचे नाव असून त्यांच्या पतीलाही अटक केली आहे.

अहमदपूर येथील खाजा मगदूम शेख यांच्या भाऊ शेख मेहराज हे कंधार येथील तहसील कार्यालयासमाेर कागदपत्रे तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या भावाला एसीबी कार्यालयातून तुमच्या विरोधात तक्रार आली असून त्याची चौकशी करण्यासाठी बोलाविण्यात आले होते. ही बाब त्यांनी खाजा मगदूम शेख यांना सांगितली. त्यानंतर शेख यांना सय्यद शकील सय्यद अजीमसाब आणि सय्यद इस्माईल सय्यद अजीम या दोघांनी संपर्क साधून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत खाजा मगदूम शेख यांनी मुंबई आणि नंतर औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली होती. २१ नोव्हेंबर रोजी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले हाेते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एसीबीने पोलिस निरीक्षक मीरा बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावसकर या दोघांना अटक केली. बकाल यांनी मध्यस्थाकडून या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तक्रारदार खाजा मगदूम शेख यांच्या भावाला वेगवेगळ्या क्रमांकावरुन आलेल्या कॉलची तपासणी करण्यात आली होती. दरम्यान, पोलिस निरिक्षक मीरा बकाल, कुलभूषण बावसकर आणि इतर दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular