नेवासा दिनांक 29 नोव्हेंबर
नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे एक इसम बेकायदेशीर गावठी कट्ट्यांची विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला कळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून नेवासा परिसरातील शिंगवे तुकाई येथे सापळा लावला होता. शिंगवे तुकाई फाट्यावर एक इसम या पथकाला संशयितरित्या नजर आल्याने पथकाने या इसमास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून दोन गावठी कट्टे व एक सिंगल बोर गावठी रिवाल्वर आणि पाच जिवंत काडतुसे असे त्याच्या झाडती मध्ये मिळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व चापोना/भरत बुधवंत यांनी केली.
शुभम सुभाष सरोदे (वय 22, रा. गुंजाळ, ता. राहुरी) ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव असून त्याच्या कडून 86 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गावठी बनावटीचे दोन कट्टे एक सिंगल बोर रिवाल्वर आणि पाच जिवंत काडतुसे असा मुद्देमाला आहे शुभम सरोदे याच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला
मॅडम, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोरउविपोअ श्रीरामपूर विभाग संदीप मिटके साहेब,यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.