Homeशहरमहाराष्ट्रात पहिल्यांदाच एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मागितली एक कोटीची लाच... तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मागितली एक कोटीची लाच… तर एमआयडीसी पोलीस ठाण्यात काही महिन्यात तीन लाचेचे प्रकरण…

advertisement

अहमदनगर दि.७ नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील एमआयडीसी गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात गाजत आहे कारण एमआयडीसी मधील अहमदनगर उपविभाग कार्यालयामधील सहाय्यक अभियंता असलेल्या अमित गायकवाड यास एक कोटी रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले होते तर यामधील तात्कालीन उप अभियंता गणेश वाघ हा अद्याप फरार आहे. अहमदनगर नव्हे तर महाराष्ट्रात प्रथमच एक कोटी रुपयांची लाच घेताना अधिकारी अडकल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.

मात्र मागील काही महिन्यात अहमदनगर शहरातील एमआयडीसी पोलिस ठाणेही चांगलेच चर्चेत राहिलेले आहे कारण एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या एक वर्षात एका परि. महिला पोलीस उपनिरीक्षक , पोलीस अंमलदार,पोलीस हवालदार लाच घेताना रंगेहात पकडल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशन चांगलेच चर्चेत आले आहे.

एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये २४ एप्रिल २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या परि. महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके व पोलीस अंमलदार खेंगट यांच्यावर नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात पकडल्याने गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी आठ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तर ११ ऑक्टोबर २०२३ रोजी विनयभंगाची तक्रार न घेता किरकोळ तक्रार घेऊन प्रकरण मिटवुन घेण्याच्या मोबदल्यात 30 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (Nagar MIDC Police Station) पोलीस हवालदार नंदलाल खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ACB Trap Case News मात्र तरीही या पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजूनही त्याच पदावर आहेत एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन कर्मचारी लाच लूचपतच्या जाळ्यात अडकूनही त्या अधिकाऱ्यावर कोणाची मेहरबानी आहे असा सवाल उपस्थित राहतोय.

जर तीन-तीन कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकत असतील तर निश्चित कुठेतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर नियंत्रण नसेल तरच असे प्रकार वाढतात त्यामुळे काही ठिकाणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा एक जरी छापा पडला तर तत्काळ त्या अधिकाऱ्याला हटविण्यात येते मात्र एमआयडीसी पोलीस स्टेशन त्याला अपवाद आहे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular