Home क्राईम पिस्तूलचा धाक दाखवून बस चालकाला गोळ्या घालण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद पोलिसांच्या...

पिस्तूलचा धाक दाखवून बस चालकाला गोळ्या घालण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद पोलिसांच्या समयसूचकते मुळे जेरबंद

श्रीरामपूर दि१ ऑक्टोबर

शुक्रवारी दि. 30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद ते शिर्डी जाणारी बस क्रमांक MH 40 BL 4180 श्रीरामपूर कडे येत असताना टाकळीभान शिवारात वीट भट्टीजवळ स्विफ्ट कार क्र. MH16 AB 4046 मधील कार चालकाने बसला गाडी आडवी लावून माझ्या गाडीला कट का मारला ? या कारणावरून कार चालकाने स्वतः जवळील पिस्टल काढून बस चालकावर रोखले व जीवे मारण्याची धमकी दिली होती.

बस मध्ये प्रवास करत असलेले पो. कॉ.विलास उकिरडे यांनी समय सूचकता दाखवत सदर घटनेची माहिती तात्काळ Dysp संदीप मिटके यांना दिली त्यानुसार त्यांनी लागलीच आपले पथकासह रवाना होत टाकळीभान परिसरात स्विफ्ट कार चा सिने स्टाईल पाठलाग करत स्विफ्ट कार क्र.MH16 AB 4046 सह कार चालक लक्ष्मण शिवाजी आरे (वय 32 वर्ष रा.गुलटेकडी, मार्केट यार्ड पुणे,) यास पिस्टलसह जेरबंद केले .

सदर घटनेत आरोपी बस चालकावर फायरिंग करण्याची धमकी देत असल्याने बस मधील प्रवासी भयभीत होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. Dysp संदीप मिटके यांनी प्रसंगावधान ओळखून आरोपीस शिताफिने जेरबंद केल्याने पुढील अनर्थ टळला व बस मधील प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला व सदर कारवाईबाबत त्यांचे व त्यांच्या पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले. आरोपी विरुद्ध श्रीरामपूर तालुका पो.स्टे. येथे बस चालक संजय फ्रान्सिस गायकवाड यांचे फिर्यादीवरून गुन्हा क्र.359/2022 भारतीय दंड संहिता कलम 353,341,186,504,506 शस्त्र अधिनियम 3/25 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील , स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , psi बोरसे, Hc सुरेश औटी,Hc भारत जाधव, Pc विलास उकिरडे यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version