Home शहर तीन विनयभंगाचे,दोन सदोष मनुष्य वधाचे ,एक जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि मारहाण...

तीन विनयभंगाचे,दोन सदोष मनुष्य वधाचे ,एक जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि मारहाण शिवीगाळ करणे असे अनेक गंभीर गुन्हे असणारा आरोपी भर रस्त्यात महिलेला अॅसिड टाकण्याची धमकी देतो नगर शहरातील गुंडागरी कोणत्या स्थरला

अहमदनगर दि .१९ सप्टेंबर

अहमदनगर शहरातील दिल्लीगेट भागात रविवारी रात्री एका विवाहित तरुणीला ॲसिड टाकून मारण्याची धमकी देण्यात आली या मागची पार्श्वभूमी अशी की यातील आरोपी मागील दोन महिन्यापासून या विवाहित तरुणीच्या मागे पाठलाग करत होता मात्र त्याची मजल थेट या विवहितेला छेडछाड करून धमकी देत गाडीवर बसून फिरायला करण्याची मागणी करण्यापर्यंत गेली होती . याप्रकरणी आता त्या विवाहित तरुणीच्या फिर्यादी वरून  तोफखाना पोलीस ठाण्यात ८१२/२०२२ भादवि क. ३५४,३५४(ड), ५०४,५०६ प्रमाणे फैजान कलीम बागवान या तरुणावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून फैजान बागवान हा त्या तरुणीचा पाठलाग करत होता तसेच याआधी त्याच्यावर तोफखाना आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचे तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करणे सदोष मनुष्य व त्याचा प्रयत्न करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत मात्र तरीही तो पुन्हा मुली आणि महिलांना छेडछाड करत असल्यामुळे कायद्याचा धाक राहिला नसल्याचे समोर येत आहे मध्यंतरीच्या काळात तारकपूर परिसरातही त्याला नागरिकांनी चांगला चोप दिला होता.

एकट्या महिलांना पाहून त्यांचा पाठलाग करणे आणि त्यानंतर त्यांची छेडछाड करणे असाच एकंदरीत फंडा या आरोपीचा असल्याचं समोर येत आहे. मात्र अशा प्रकरणांमुळे नगर शहरातील महिलांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण होऊ शकते.त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता बीट मार्शल पद्धत पोलिसांनी सुरू करणे गरजेचे आहे. बीट मार्शल च्या गाड्या फिरत असल्यामुळे थोडाफार का होईना वचक अशा गुंडांवर बसत होता. मात्र सध्या बिट मार्शल च्या गाड्या शहरात कुठेही फिरताना दिसत नाहीत.त्यामुळे पुन्हा एकदा छेडछाडीचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. नगर शहरातील दिलासा विभागाची गाडी फिरते मात्र शाळा कॉलेज  या पलीकडे गल्ली बोळीत ही गाडी जात नसल्याने काही गोष्टींच्या मर्यादा येत आहेत. त्यामुळे बीट मार्शल पुन्हा सुरू करावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे आली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version