Homeशहरसहकार नगर येथील माऊली कृपा मंडळ यांच्या वतीने श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड...

सहकार नगर येथील माऊली कृपा मंडळ यांच्या वतीने श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत संपन्न वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंग विठ्ठलाची सेवा – सचिन जगताप

advertisement

अहिल्यानगर : दिनांक 27 जून

वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंग विठ्ठलाची सेवा असून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो वारसा आपल्याला दिलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करावे लागेल या माध्यमातून अध्यात्मिकतेची गोडी निर्माण होईल सुसंस्कृत पिढी निर्माण करायची असेल तर त्याला धार्मिकतेची जोड द्यावी लागेल वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तीमय होत असतों या माध्यमातून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येत श्री विठुरायाच्या नामाचा गजर करत असतात या माध्यमातून मनुष्याचे जीवन आनंदमय होत असते असे प्रतिपादन आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी केले.

सहकार नगर येथील माऊली कृपा मंडळ यांच्या वतीने श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत संपन्न झाले. यावेळी आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप, शिवाजी डोके, मा.नगरसेवक नितीन शेलार, गणेश टांगळ, अनिकेत उमाप, ऋषिकेश पदमन, गणेश तुंगार, शेखर खटावकर, राहुल जगधने, अजिंक्य वांजे, रवी औटी, आकाश तुंगसे, शुभम उमाप, किरण तुंगसे, वरद पदमन, गणेश शिंदे, अक्षय लिमकर आदीसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवाजी डोके म्हणाले की श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड हे भाविकांचे श्रद्धास्थान असून श्री विठुरायाच्या दर्शनासाठी पायी दिंडी सोहळा जात असताना वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम माऊली कृपा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे करण्यात येत असते तसेच वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावेळी तीन मंदिर परिसरामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते असे ते म्हणाले

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular