अहमदनगर दि.२१ डिसेंबर
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सकाळपासून छापे पडत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे छापे नेमके कोणाचे आहेत याची अजून खात्री झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय पथकाचे छापे असल्याची माहिती मिळत आहे नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसर तसेच मुकुंद नगर, भिंगार परिसरातही छापे पडल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती नसून फक्त छापे पडत आहेत याची चर्चा मात्र जोरदार सुरू आहे