Homeशहरप्र.क्र.आठ मधील नागरिकांना मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन कोटी रुपये मंजूर...

प्र.क्र.आठ मधील नागरिकांना मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन कोटी रुपये मंजूर विकास कामांची दिली अनोखी भेट – महापौर रोहिणी ताई शेंडगे

advertisement

अहमदनगर दि.१ डिसेंबर –
बोरुडे कुटुंबीयांचा सामाजिक, स्नेह बंधनाचा व संस्काराचा वारसा मा. उपमहापौर अनिल अनिल बोरुडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवला आहे. ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन काम करीत आहे त्यामुळे त्यांना ज्येष्ठांच्या विचाराचा अनमोल ठेवा मिळाला आहे माजी उपमहापौर अनिल बोर्डे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामांतून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे अशी त्यांची ओळख आहे.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी गरजूंना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आपले कर्तव्य पार पाडले आहे. याचबरोबर प्रभागामधिल नागरिकांना वाढदिवसाचे अवचित्य साधून सुमारे दोन कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून एक अनोखी भेट दिली आहे. माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांनी गेली पंचवीस वर्षात नगरसेवक पदाच्या माध्यमातून विकास कामांतून शहरात आदर्श प्रभाग निर्माण केला आहे.असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.

मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक आठ मधील सुडके मळा व बोरुडे मळा येथील रस्ता विकास कामांचा शुभारंभ महापौर रोहिणी ताई शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ,मा. विरोधी पक्षनेता संजय शेंडगे,महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, भीमाशंकर लांडे, नाना लांडे, श्री नातू साहेब,नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक शामआप्पा नळकांडे, संदीप बोरुडे, विजयकुमार बोरुडे, प्रदीप बोरुडे, गोरख बोरुडे, विष्णू फुलसौंदर, नंदू बोरुडे, नानासाहेब भोर, शरद बोरुडे, ओंकार बोरुडे, गोरख पडोळे,श्री देशमुख,श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ, संकल्प ग्रुप, युवा ग्रुप,जय मातादी ग्रुप,व बोरुडे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी भीमाशंकर लांडे म्हणाले की, मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांनी तळघळातील व्यक्तीपर्यंत जाऊन विकास कामे केली आहेत जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेतृत्व प्रभागाला मिळाली आहेत लोकप्रतिनिधींचा वाढदिवस म्हणला की तरुणांची संख्या अधिक असते मात्र मा. उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वात जास्त उपस्थिती ज्येष्ठ नागरिकांची दिसून आली आहे ज्येष्ठांचा आदर सन्मान करून आडी अडचणींच्या काळात उभे राहून मदत करतात प्रभागातील माता-भगिनी व नागरिकांची आपुलकीने विचारपूस करीत विकासाची कामे मार्गी लावत असतात आता प्रभागातील नागरिकांची एकच इच्छा आहे की त्याना महापालिकेच्या महापौर पदाची संधी मिळावी असे ते म्हणाले
यावेळी मा. उपमहापौर अनिल बोरुडे म्हणाले की, बोरुडे कुटुंबियातून मिळालेल्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन व प्रभागातील नागरिकांच्या प्रेमामुळे सामाजिक काम करण्याची संधी मिळाली आहे केलेल्या विकास कामांचे श्रेय हे जनतेला जाते आज माझ्या वाढदिवसानिमित्त महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सुडके मळा येथील रस्ता कॉंकटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच बोरुडे मळा येथील लक्ष्मी माता मंदिर रस्त्याची कामही सुरू झाले आहे. कल्याण रोडवरील गणेश नगर शंकर महाराजांच्या मठ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करण्यात आले आहे.तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथे गरजू रुग्णांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले आहे. तपोवन रोड येथील बालघर येथे किराणा वाटप करण्यात आला आहे. केडगाव येथील स्नेहालय संचलित स्नेहांकुर संस्थेला गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. संकल्प ग्रुप, युवा ग्रुप, बोरुडे कुटुंबीय व युवकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम साजरे केले आहे. प्रभागामधील बालिकाश्रम रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते त्याला यश आले व या भागामध्ये व्यवसायिकरणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे याचबरोबर प्रभागामध्ये नागरिकांना मनोरंजनासाठी व लहान बालकांना खेळण्यासाठी सुमारे दहा उद्यानांची निर्मिती केली आहे असे ते म्हणाले.
यावेळी मा.उपमहापौर अनिल बोरुडे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, मा.महापौर भगवानराव फुलसौंदर, मा.महापौर बाबासाहेब वाकळे, मा. महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, भाजप शहराध्यक्ष भैया गंधे, नगरसेवक अनिल शिंदे, दगडू मामा पवार, विक्रम राठोड, अविनाश घुले, गणेश कवडे, दत्ता जाधव, दिलीप सातपुते, अभय गुजराती, किशोर डागवाले धनंजय जाधव,आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular