बीड दि १५ एप्रिल
बीडच्या गढी येथील खासगी वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्टर पती-पत्नीला गुंडांनी शुल्लक कारणावरून बेदम मारहण करण्याची घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
या प्रकरणी महीला डॉक्टरच्या फिर्यादीवरून गोरख सूर्यवंशी, राहुल सूर्यवंशी व भाऊराव सूर्यवंशी या तिघांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पहा व्हिडीओ
काहीच कारण नसताना आम्ही समजून सांगत असताना, अचानक येऊन त्यांनी मारहाण केली. माझ्या पत्नीला देखील त्यांनी मारहाण केली तसेच हाताने ओढणी ओढून विनयभंग केला. तसेच आता दवाखाना चालू देणार नाही. असं पीडित डॉ.संभाजी पवार यांनी सांगितलं.