Homeक्राईमउच्चभ्रू सोसायटीतील कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्या मिश्रा वर कठोर कारवाई करण्याची...

उच्चभ्रू सोसायटीतील कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी त्या मिश्रा वर कठोर कारवाई करण्याची मागणी

advertisement

अहमदनगर दि.८ डिसेंबर

अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड वरील उच्चभ्रू वस्तीतील एका कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला असून याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात अली आहे.

गुलमोहर रोड वर असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये पैशाच्या वादातून एका प्रतिष्ठित कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीला शिवीगाळा करून घरातील संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी हेमंत मिश्रा नामक व्यक्तीने दिल्याचा प्रकार घडला असून याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उसने घेतलेल्या पैशावरून ही वादावादी झाली असून यामध्ये तक्रार दिलेल्या व्यक्तीच्या नातूने हेमंत मिश्रा नामक व्यक्तीकडून पैसे घेतले होते मात्र संपूर्ण पैसे देऊनही हेमंत मिश्रा नामक व्यक्ती अजून पैशाची मागणी करत होता पैसे मिळत नसल्याने हेमंत मिश्राने थेट त्या तरुणाचे घर गाठून पैशाची मागणी केली त्यावेळी त्याला त्या प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तींनी समजावण्याचा प्रयत्न केला असता मिश्राने शिवीगाळ करून कुटुंबातील संपूर्ण व्यक्तींना जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.

याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस तपास सुरू असून.जिल्हा पोलीस अधीक्षकांची या प्रतिष्ठित कुटुंबीयांनी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. मिश्रा नामक व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular