Home जिल्हा वरिष्ठ अधिकारी आणि कंपनी चालकाशी वादावादी भोवली पोलीस नाईक निलंबित

वरिष्ठ अधिकारी आणि कंपनी चालकाशी वादावादी भोवली पोलीस नाईक निलंबित

शेवगाव दि.२० एप्रिल

कामावर गैरहजर राहत असल्याचा आणि पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांन बरोबर जनमाणसांत भांडण करूनपोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक दीपक पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढला आहे.


शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोना.दीपक पवार यांना १६ जानेवारी २०२२ ला सकाळी ८ ते १० लॉकअपगार्ड ड्युटी नेमण्यात आली होती.मात्र साडेदहा वाजत पोलीस निरीक्षकांच्या तपासणीत ते हजर नसल्याचं आढळून आले होते.

याबाबत स्टेशन डायरीला नोंद घेण्यात आली. त्यानंतर काही वेळाने पो.ना.पवार तेथे आले आणि कंपनी चालक किशोर शिरसाठ यांच्याशी भांडू लागले. याबाबत पोलीस निरीक्षकांच्या दालनात अधिकाऱ्यांनी समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोर सुध्या मोठ आवाजात बोलू लागले. त्यानंतर पुन्हा बाहेर येत पो ना पवार यांनी शिरसाठ यांच्याशी वाद घालून त्यांच्या अंगावर धावून जात झोबाझोंबी केली, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या पटांगणात व तेथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांसमोर घडला होता.या आधीही त्यांनी ड्युटी नेमण्यावरून आणि गुन्हे तपासणी साठी टाळा टाळ केली असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version