अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मंगळवारी अहमदनगर जिल्ह्याची शिवसेनेची नूतन कार्य करणे जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, उपजिल्हाप्रमुख पै. सुभाष लोंढे ,शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्कप्रमुख सचिन जाधव तर भिंगार शहरप्रमुख म्हणून सुनील लाल बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले होते.
दरम्यान आज सर्व पदाधिकारी अहमदनगर शहरात परतले असून आज पासून सर्वजण आपल्या पदाची कामकाजाची सुरुवात करणार आहेत. त्या आधी सर्वजण अहमदनगर शहराचे माजी आमदार माजी मंत्री कै. अनिल भैय्या राठोड यांच्या शिवालय या कार्यालयात जाऊन अनिल भैय्या राठोड यांच्या तैल चित्राचे दर्शन घेऊन कामकाजास सुरुवात करणार आहेत. शिवसेनेतून वेगळ्या गट निर्माण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर शिवसैनिक हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या बरोबर न राहता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची ही शिवसेना असून त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आपण बाहेर पडल्याचं वेळोवेळी सांगत आहेत.
मात्र अहमदनगर शहरातही महानगरपालिकेवर राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेचा महापौर आहे. याबाबतही शिवसेनेत दोन मतप्रवाह असून राष्ट्रवादी बरोबरची युती अनेकांना रुचलेली नाही. आणि आता अहमदनगरचे नूतन पदाधिकारी स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या शिवालय कार्यालय इथून आपल्या कामाची सुरुवात करणार आहेत.