Home राजकारण शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबेना तीन नगरसेवक आणि एका उपशहरप्रमुखाचा शिंदे गटात...

शिवसेनेला लागलेली गळती थांबता थांबेना तीन नगरसेवक आणि एका उपशहरप्रमुखाचा शिंदे गटात प्रवेश

अहमदनगर दि.२९ जुलै-

अहमदनगर शहारत शिवसेनेला लागलेली गळती काही करून थांबताना दिसत नाही. नगर शहरातील शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अनिल शिंदे माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते सचिन जाधव, काका शेळके यांच्या सह काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरुवातीला एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे गटात न जाण्याचा आवाहनही केलं होतं. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरातून प्रतिज्ञापत्र ही देण्यात आले होते मात्र त्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.

भिंगार शहरातील छावणी मंडळाचे नगरसेवक रवींद्र लालबुंद्रे नगरसेवक प्रकाश फुलारी,नगरसेवक संजय छजलानी तसेच शिवसेनेचे उपशहर प्रमुख शशांक महाले व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे घाटात प्रवेश केला आहे. याप्रसंगी माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक अनिल शिंदे सचिन जाधव,काका शेळके व विजय बोरुडे आदी उपस्थित होते.


त्यामुळे शिवसेनेला लागलेली गळती मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली दिसत आहे. अनेक शिवसैनिक सध्या तळ्यात मळ्यात असून नेमकं कुठे जाऊ हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मात्र काही दिवसात नगर शहरातून अनेक शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करतील असा विश्वास नगर शहरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी शिंदे यांना दिला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने अहमदनगर शहरातील राजकीय समीकरणे हळू हळू बदलणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version