अहमदनगर दि.४ एप्रिल
अहमदनगर शहरा जवळील गजराज नगर परिसरातील मिरावली बाबा पाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोन दुचाकी वाहने पेटवून देण्यात आली होती मात्र या घटनेनंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी द्यावं घेतली होती नगर शहराचे उपअधीक्षक अनिल काकडे हे सर्वप्रथम घटनास्थळावर पोहोचले होते.
शहरामध्ये शांतता आहे कोणताही अनुचित प्रकार घडला नसून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवहान केले आहे शहरात कुठेही दगडफेक झाली नसून कोणत्याही मंदिर अथवा मज्जीद वर दगडफेक झालेली नाही काही ठिकाणी अशा अफवा पसरल्या जात आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
ही घटना कळताच शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच मुकुंद नगर परिसरात येऊन पाहणी केली व शांततेचे आवाहन केले शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाची त्यांनी चर्चा केली