अहमदनगर दि.५ एप्रिल
अहमदनगर शहरात अर्बन बँक चौकात माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचे नातू सर्वेश बार्शीकर यांना मारहाण करण्याची घटना घडली असून यामुळे काही वेळ धावपळ उडाली होती. या घटनेमध्ये सुर्वेश बार्शीकर हे जखमी झाले असून त्यांना अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना नेमकी काय आहे याबाबत आता पोलीस तपास करत असून कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेबाबत आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. तर अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्वेश बार्शीकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच शहरात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केल आहे.