अहमदनगर दि.११ जुलै
अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर शहराबाहेरील बायपास परिसरात एका तरुणाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहे.
औरंगबादच्या गंगापूर येथील महेश काळे हा युवक नगर शहरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने नगर औरंगाबाद रोडवरील बायपास चौकामध्ये सापळा रचून महेश काळे यास ताब्यात घेतले महेश काळे यांच्याकडून चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत कडतुस हस्तगत करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पर्यंत अनेक गावठी कट्टे पकडले आहेत. या गावठी कट्ट्यांचे कनेक्शन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये जात असून त्या ठिकाणावरून हे कट्टे अहमदनगर जिल्ह्यात विकण्यासाठी येत आहेत. मात्र अनेक वेळा मोठ्या कारवाई होऊन सुद्धा कट्टे विकण्याचे आणि विकत घेण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / सोपान गोरे, सफौ/ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/ संदीप पवार, सुनिल चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोना / शंकर चौधरी, रवि सोनटक्के, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/आकाश काळे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली .