Home Uncategorized अहमदनगरच्या गायिकेचा आवाज पोहचला संपूर्ण देशभर अपूर्वा निषाद हिचे “रामा ओ रामा”...

अहमदनगरच्या गायिकेचा आवाज पोहचला संपूर्ण देशभर अपूर्वा निषाद हिचे “रामा ओ रामा” गाण्याने रचला इतिहास..अयोध्येत घुमला “रामा ओ रामा” गाण्याचा सुर

अहमदनगर दि.२० जानेवारी

सध्या संपूर्ण भारत (india)आणि जगातही अयोध्या (ayodhya ) येथील राम मंदिर आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती स्थापनेची प्रतीक्षा लागलेली आहे. संपूर्ण भारत भक्तिमय वातावरणात 22 तारखेला रामाचे (lord Rama) स्वागत करण्यासाठी तयार झालेला आहे. याच पार्श्वभूमीवर अपूर्वा निषाद या गायिकेचे “रामा ओ रामा” (Rama o Rama ) या नावाने नवीन गीत Youtube वर रिलीज झाले आहे. या गीताला सध्या जबरदस्त प्रतिसाद देखील मिळत आहे. अपूर्वा निषाद यांच्या या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतः अपूर्वा निषाद यांनी हे गीत कंपोझ करून त्यांनी गायले आहे.

चित्रपट जगतातील सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याकडे अहमदनगर मधील अपूर्वा निषाद ही गायनाचे धडे गिरवत आहे. या दरम्यान अपूर्वा निषाद यांचा संपूर्ण महाराष्ट्रात “महानिर्माण घडवुया” या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.

याशिवाय अपूर्वा निषादला गायक डबू मलिक यांच्या “तुम कभी ना भुलना” या गाण्याने त्यांना संपूर्ण राज्यात एक वेगळीच ओळख दिली आहे. तर अपूर्वा निषाद यांचा आता अयोध्येत रामललाच्या मूर्तीचा अभिषेका निमित्त एक नवीन गीत रिलीज झाले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या येथे राम मंदिर सजावट पाहात असताना अपूर्वा निषाद यांचे गीत वाजविले गेले होते. याच बरोबर सोशल मीडियावर असणारे अध्यात्मिक पेज तसेच केंद्राने आपल्या सोशल नेटवर्किंग मध्ये हे “रामा हो रामा” गाणे ट्रेडिंग झाल्याचे कौतुकास्पद विधान केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version