Home क्राईम शहर सहकारी बँक कर्ज घोटाळा प्रकरण.. मर्दा कदम यांना जामीन मंजूर..

शहर सहकारी बँक कर्ज घोटाळा प्रकरण.. मर्दा कदम यांना जामीन मंजूर..

अहमदनगर दि.२० जानेवारी

शहर सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात प्रतिष्ठित चार्टर्ड अकाऊंटंट विजय विष्णुप्रसाद मर्दा यास जामीन मंजूर झाला असून मर्दा सह
मशिन कंपनीचा डीलर जगदीश कदम यास जामीन मंजूर झाला असून एडवोकेट सतीश गुगळे आणि एडवोकेट महेश तवले एडवोकेट संजय वालेकर यांनी विजय मर्दा आणि जगदीश कदम यांच्यातर्फे काम पाहिले.

विजय मर्दा आणि जगदीश कदम या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केले होते.अटक केल्या नंतर पोलीस कस्टडी संपल्यानंतर दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

शहर सहकारी बँकेच्या फॉरेन्सिक ऑडिटमुळे जे काही धागेदोरे मिळाले त्या आधारे कारवाई झाली होती .डॉ. निलेश शेळके व मर्दा याने एकत्र जमीन खरेदी केली. या दोघांचे आर्थिक व्यवहार असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.

13 डिसेंबरच्या रात्री पोलिसांनी विजय मर्दा यास दापोली येथून अटक केली होती त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयासमोर हजर केल्यानंतर विजय मर्दा यास तपासासाठी पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती तपास पूर्ण झाल्यानंतर मर्दा आणि जगदीश कदम हे न्यायालयीन कोठडीत होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version