Home क्राईम डीवायएसपीची पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ कर्मचाऱ्याने केली गृहमंत्री, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

डीवायएसपीची पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ कर्मचाऱ्याने केली गृहमंत्री, पोलीस आयुक्तांकडे तक्रार

बीड दि.२० एप्रिल

सेवनिवृत्तीला काही दिवस बाकी असणारर्या एका पोलीस कर्मचाऱ्यास डीवायएसपी पदाच्या अधिकाऱ्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अपमानीत करण्याची घटना बीड तालुक्यातील माजलगाव येथे घडली आहे.

एस.एच.राठोड असे पोलीस कर्मचार्यांचे नाव असून डीवायएसपी सुनिल जयभाये असे शिवीगाळ करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मी अनेकांची वाट लावलीय, आता तुझी लावतो…असं म्हणत नोकरीतून सस्पेंड करण्याची थेट धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडित हवालदाराने थेट गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

डीवायएसपी सुनील जायभाये हे ग्रामीण पोलीस ठाण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात काही लोक गर्दी करून बसल्याचे दिसले असता त्यांनी पोलीस कर्मचारी राठोड यांना ठाण्याच्या आवारात हे कोण लोक जमा झालेत ? तुम्ही त्यांना इथे का थांबू दिले ? असे विचारले.राठोड यांनी अपघातातील गाडीच्या चौकशीसाठी काही लोक हे फिर्याद घेऊन आल्याचे सांगितले. मात्र त्यावर सुनील जायभाये यांना इथे कशाला बसू देता. तसेच बसण्यासाठीचे सिमेंट बाकडे कशाला ठेवले म्हणत शिवीगाळ केली. ते तोडून टाका असे म्हणत स्वतः बाकड्यावर लाथ मारली आणि तोडून टाकले. तसेच वर्षीय यांना सिमेंटचे बाकडे तुम्ही स्वतः उचलून बाजूला मांडा असे सांगितले. त्यावर राठोड यांनी माझा पाय फॅक्चर आहे सांगितलं.तेव्हा सर्वांसमक्ष आई बहिणीवर शिवीगाळ करत तुझा दुसरा पाय देखील फ्रॅक्चर करून टाकीन. तुला सस्पेंड करील, अशी धमकी देत “मी भोकरदनला असताना अनेकांची वाट लावलीय, आता तुझी पण वाट लावतो”, अस म्हणत शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार पोलीस कर्मचारी एस.एच.राठोड यांनी केली असून न्याय देण्याची मागणी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version