अहमदनगर 30 एप्रिल
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे रंगत दिवसेंदिवस वाढत असून रोजच नवनवीन किस्से अहमदनगर दक्षिण मतदार संघात पाहायला मिळत आहेत. निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले असून ही निवडणूक दुरंगीच होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही निवडणूक होणार असून ज्या उमेदवारामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार होती असे एम आय एम पक्षाचे उमेदवार ‘एमआयएम’चे नगर जिल्हाध्यक्ष परवेज उमर शेख यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे सर्वांना एकच धक्का बसला होता. अर्ज भरल्यापासून ते अर्ज मागे घेण्यापर्यंत हा एक नाट्यमय प्रवास सुरू होता. अर्ज मागे घेतल्यानंतर आता परवेज शेख यांना त्यांच्या मोबाईलवरून धमकी देण्यात आली असून तू और तेरे साथ वाले दिन गीनना चालू कर दे…. आशा धमकीचा फोन त्यांना आला आहे.
परवेज शेख यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पक्षाने आदेश दिल्यामुळे मी अर्ज भरला होता मात्र पक्षानेच आदेश दिल्यामुळे मी अर्ज मागे घेतला त्यामध्ये माझी भूमिका कोणतीच नव्हती मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर शेख यांच्यावर चांगलीच टीका झाली असून त्यांच्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून शेख यांनी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप केला आहे त्यामुळे आता या धमकीमुळे पक्षातच दोन गट निर्माण झाल्याचं समोर आले आहे.