अहमदनगर दि.१७ ऑगस्ट
१९ ऑगस्ट रोजी गोपाळकालाच्या निमित्ताने सावेडी उपनगर मधील अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई” या हिंदी चित्रपटात भूमिका करणारी सिनेअभिनेत्री प्राची देसाई ही राहणार आहे.
नगर शहरात मोजक्याच दहीहंड्या होणार असून त्यामध्ये गंगा उद्या न परिसरातील चौकात यावर्षी प्रथमच अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असल्यामुळे आणि सिने अभिनेत्री प्राची देसाई यांची प्रमुख उपस्थिती आहे.
अभिनेत्रीला पाहण्यासाठी तरुण, तरुणांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. त्यामुळे गर्दी लक्षात घेता या दहीहंडी उत्सवाच्या दरम्यान पाहायला येणाऱ्या महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी दिली आहे. यामुळे दहीहंडी पाहण्यास येणाऱ्या महिलांना चांगल्या प्रकारे दहीहंडी पाण्याचा आनंद मिळू शकेल.