Home क्राईम डोळ्यात मिरचीची पूड फेकत साडेतीन लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार नगर शाहरतील...

डोळ्यात मिरचीची पूड फेकत साडेतीन लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार नगर शाहरतील घटना

अहमदनगर दि.१७ ऑगस्ट

सावेडी उपनगर मधील भगवान बाबा चौक परिसरात डोळ्यात मिरचीची पूड फेकून चित्रपटाला शोभेल आशा स्टाईलने सुमारे साडेतीन लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी लंपास केली आहे.ही घटना १६ ऑगस्ट रोजी संधकाळो साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.


शामराव नागवडे हे दालमंडई वरुन हिंदुस्तान एजन्सी कंपनीचे बील कलेक्शन करून सुमारे साडेतीन लाख रुपयांची रक्कम आपल्या बॅगमध्ये घेऊन घराकडे जात असताना. एक अज्ञात इसम भगवान बाबा चौक या ठिकाणी रात्री साडेदहाच्या सुमारास स्प्लेंडर मोटरसायकलवर दबा धरून उभा होता. नागवडे यांची गाडी अडवून शिवीगाळ करत काल तू कोणाला मारत होता असं विचारत आणि त्या गडबडीत मिरचीची पूड नागवडे यांच्या डोळ्यात फेकून त्यांच्या जवळ असलेली साडेतीन लाख रुपया ंची रक्कम असलेली बॅग स्कूल पळून घेऊन गेला.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शामराव नागवडे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधात भादवी कलम 396,34 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version