अहमदनगर दि. ११ ऑगस्ट
अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे नाना कारमाने आतापर्यंत चव्हाट्यावर आले आहेत. नगर शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आरोग्य विभाग वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतो.
असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला असून राज्यात सध्या सर्वच ठिकाणी डोळ्याच्या आजाराची संसर्गजन्य साथ सुरू असून ही साथ अहमदनगर शहरातील काही प्रमाणात आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य अधिकारी यांच्या सहीनिशी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते. यामध्ये डोळ्याच्या साथीमुळे अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये नागरिकांसाठी मोफत आय ड्रॉप चे वितरण करण्यात येणार असून याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असून महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात अशा प्रकारची कोणतीही लस (आय ड्रॉप ) शिल्लकच नसल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा ताई आठरे यांनी उघडकीस आणला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एक स्टिंग ऑपरेशन करून अहमदनगर महानगरपालिकेच्या माळीवाडा येथील महात्मा फुले आरोग्य केंद्र आणि भोसले आखाडा येथील जिजामाता आरोग्य केंद्रामध्ये जाऊन एका डोळ्याचा संसर्ग झालेल्या पेशंटला आय ड्रॉप ची मागणी केली मात्र आय ड्रॉप अद्याप अहमदनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाकडून मिळाले नसल्याची धक्कादाक माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली.तसेच यावेळी एका मुलाला भटके कुत्रे चावल्याने त्यास अँटी रेबीज लस देण्याची गरज असताना ती लस उपलब्ध नसल्याचे पेशंटच्या नातेवाईकांना सांगण्यात आले. यावरून अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा बे जबाबदारपणा समोर आला असून नागरिकांना फसवे आणि खोटे आवाहन करून आरोग्य केंद्रात वेगळाच गोंधळ सुरू असल्याचं समोर आले आहे.
महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र फक्त शोभे करता आहेत का काय असा प्रश्न समोर येत असून याबाबत जेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगण्यात आली त्यावेळी त्यांनी तातडीने आरोग्य केंद्रांना आय ड्रॉप पाठवून दिले. यावरूनच वरातीमागून घोडे असाच काहीसा प्रकार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुरू असून शहरातील आरोग्य केंद्रातील उपलब्ध असलेल्या औषधांचे ऑडिट करून आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभार व बाबत चौकशी करावी तसेच आरोग्य अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.