अहमदनगर दि.११ ऑगस्ट
अहमदनग शहरा जवळच असलेल्या खुळेवाडी परिसरातील सुलभ शौचालय मध्ये औरंगाबादचे फोटो लावण्यात आले होते मात्र हे फोटो पोलिसांनी तातडीने जाऊन हटवले आहेत.
अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांच्या बद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करण्याच्या घटना घडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागात सोशल मीडियावर काही फोटोही व्हायरल करण्यात आले होते तर काही दिवसांपूर्वी एका उरूस कार्यक्रमादरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आल्यानंतर याबाबत अत्यंत चीड व्यक्त करण्यात आली होती औरंगजेबाची ओळख क्रूर म्हणून इतिहासात नोंद आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करून त्यांना अत्यंत निर्घृण मारण्याचा इतिहासही असून या औरंगजेबाचे उदत्तीकरण काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत की जेणेकरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल. याच औरंगजेबाचे फोटो आता भिंगार परिसरातील खळेवाडी शौचालयामध्ये लावण्यात आले होते मात्र खबरदारी म्हणून भिंगार कॅम्प पोलिसांनी ते फोटो हटवले असल्याची माहिती मिळतेय.