अहमदनगर दि.३१ ऑगस्ट
अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे मात्र ओबीसी आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुकीची घोषणा होणार नाही या सुनावणी मुळे राज्यातील मुंबई ठाण्यासह जवळपास 15 महानगरपालिका आणि सत्तरच्या वर नगरपालिकेची निवडणुकीची प्रक्रिया खोळंबली आहे. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये अहमदनगर शहरासह धुळे महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिका तसेच इतर काही महानगरपालिका आणि इतर काही नगरपालिकेची निवडणूक होत असते मात्र सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी आता पुन्हा पुढे ढकल याची माहिती समोर येत असून यामुळे आता अहमदनगर सह इतर महानगरपालिकेची निवडणूक ही पुढे ढकलण्याची दाट शक्यता आहे.
अहमदनगर शहरात निवडणुकीची रणधुमाळी अप्रत्यक्षरित्या सुरू झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवार सण उत्सवाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शहरात सण उत्सवाच्या माध्यमातून मोठमोठे फ्लेक्स लावले जात असून यातूनच निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली जात आहे. मात्र एक सप्टेंबर रोजी होणारी ओबीसी आरक्षणाची सुनावणी आता पुढे ढकलली असल्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 2018 साली 9 डिसेंबर 2018 ला मतदान होते आणि दहा डिसेंबर 2018 ला निवडणुकीचा निकाल लागला होता. त्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी तसेच प्रभाग रचना आणि आरक्षण याबाबत सप्टेंबर मध्ये सोडत होणे गरजेचे आहे. तरच डिसेंबर पर्यंत निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाऊ शकते मात्र जर ओबीसी आरक्षणाचा निकाल लागला नाही तर अहमदनगर महानगरपालिकेची नगरसेवकांची निवडणूक लांबणीवर जाणार आहे हे निश्चित झाले आहे.