अहमदनगर दि.१२ मार्च
अहमदनगर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील पहिल्या मजल्यावरून एका तरुण पडला अशी माहिती समोर येत असून नेमका तो पडला का उडी मारली याबाबत संभ्रम आहे केडगाव परिसरातील हा तरुण असल्याचे चर्चेतून समजले आहे मात्र हा प्रकार कसा झाला कोणीच न पाहिल्याने महानगरपालिकेत एकच चर्चेचा विषय झाला आहे. पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने संगणक विभागातील कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन त्या तरुणाला 108 ॲम्बुलन्स बोलून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.