अहमदनगर दि.१३ एप्रिल
अहमदनगर मधील नगर अर्बन मल्टीस्टेट को- आप (शेड्युल) बँकेची 15 एप्रिल रोजी सर्वसाधारण सभा अहमदनगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे दुपारी एक वाजता सभा होणार असून
सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक यांच्या आदेशानुसार ही सभा होणार आहे या सभेत मुख्यत्वे दोन विषय असून


नगर अर्बन मल्टीस्टेट को- आप (शेड्युल) बँकेची परिस्थिती अत्यंत खालावली असून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत साडेतीनशे कोटी रुपये थकबाकी असून व्याजा सह ही रक्कम मोठी असल्याचे बँक बचाव समितीचे राजेंद्र चोपडा यांनी सांगितलंय ज्या कर्जदारची परतफेडीची क्षमता नाही त्यांना कोट्यवधी रुपये कर्ज दिली गेली आहे. कायद्याच्या तरतुदी नुसार कर्जवसुली होत नाही संचालक मंडळ दिशाभूल करून प्रशासनाची फसवणूक करतेय बँकेच्या एक लाख पंधरा हजार सदस्यांनी जागृत होऊन येणाऱ्या सभेमध्ये बँक वाचवण्यासाठी आवाज उठवावा असे आवाहन राजेंद्र चोपडा यांनी पत्रकार परिषदेत केल आहे.
1910 मध्ये स्थापन झालेल्या बँकेची नामुष्की होत असून खुर्च्याला चिकटून बसलेल्या संचालकांनी राजीनामा द्यावा तसेच रिझर्व बँकेने सांगून सुद्धा हे संचालक राजीनामा देत नाही यावरूनच त्यांना भ्रष्टाचार लपवायचा आहे हे समोर येत आहे हे सर्व संचालक सभासदांची दिशाभूल करून स्वार्थ साधण्यासाठी बँकेच्या खुर्चीवर बसलेले आहेत अनेक नागरिकांच्या संस्थांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बँकेत अडकल्या आहेत त्यामध्ये सहकार खात्याच्या ठेवी सुद्धा अडकल्या असल्याची माहिती बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले
एडवोकेट सागर गुंजाळ यांनी सांगितले आहे की ही बँक वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्ही कोणाच्याही एका संचालकाच्या विरोधात नाही मात्र ती विधारांबाबत आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत बँकेमध्ये त्या गोष्टी बेकायदेशीर होत आहेत त्याला आम्ही विरोध करणार असून जास्तीत जास्त सभासदांनी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहून ही वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि बँकेला वाचवण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान यावेळी सागर गुंजाळ यांनी केले आहे तर या पत्रकार परिषदेला सदाशिव देवगावकर,अच्युत पिंगळे, ज्ञानेश्वर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.