Home शहर मनपा हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्याची संधी अन्यथा होऊ शकते...

मनपा हद्दीतील अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घेण्याची संधी अन्यथा होऊ शकते दंडात्मक कारवाई

अहमदनगर दि१८ जुलै
अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील ज्या नळ कनेक्शन धारकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन असतील आशा नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करणे कामी एक महिन्याची मुदत देण्यात येत असून या कालावधीत त्यांचे कडून रू.३,७००/- + दंडनीय आकार रू. ३०००/- याप्रमाणे एकूण रू. ६,७००/- इतकी रक्कम भरून नळ कनेक्शन अधिकृत घेण्याबाबत महापालिकेने जाहीर आवाहन केले आहे.

अन्यथा सदरची एक महिन्याची मुदत संपल्या नंतर म्हणजेच दि. ०१/०९/२०२२ पासून मालमत्ता कर
आकारणी करणारे सर्व प्रभागाकडील कर्मचा-या मार्फत विशेष शोध मोहिम राबवून, समक्ष जागेवर जावून
पाहाणी करून वसुली विभागाकडून उपलब्ध नोंदी व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले नळ कनेक्शन शोधून
ज्या नागरिक नळ कनेक्शन अनधिकृत असल्याचे निदर्शनास येईल त्यांचेकडून रू.३,७००/- + दंडनीय
आकार रू.४०००/- याप्रमाणे एकूण रू. ७,७००/- वसूल करून त्यांचे विरूध्द थेट फौजदारी स्वरूपाचा
गुन्हा दाखल करण्यात येईल असेही महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version