Home शहर पथविक्रेत्यांना हक्काची जागा आणि कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पथविक्रेता समिती गठीत, पथविक्रेत्यांना सर्वेक्षण...

पथविक्रेत्यांना हक्काची जागा आणि कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पथविक्रेता समिती गठीत, पथविक्रेत्यांना सर्वेक्षण यादी मध्ये नाव नोंदवण्याची शेवटची संधी

अहमदनगर दि २७ एप्रिल
कापड बाजारातील अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर
आल्यानंतर अखेर पथविक्रेत्यांना हक्काची जागा आणि कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पथविक्रेता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची मंगळवारी आयुक्तांसमवेत मनपात पाहिली बैठक झाली.

या बैठकीला आयुक्त शंकर गोरे यांच्यासह उपायुक्त श्रीनिवास कुरे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे, प्रभाग अधिकार राकेश कोतकर, समिती सदस्य संजय झिंजे, शाकीर
शेख, आजम शेख, सुनीता शिंदे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे व पथविक्रेते उपस्थित होते.

पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची मागणी या वेळी समितीने केली. आयुक्त गोरे म्हणाले, पथविक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात येणार आहे. पथविक्रेता कायदा तसेच पथविक्रेता नियम २०१७ अन्वये सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शहरात २ हजार ८४२ पथविक्रेते आढळून आलेआहेत.

समितीच्या मागणी नुसार ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण राहिले असेल त्यांचे सर्वेक्षण करण्याचे या बैठकीमध्ये ठरविण्यात आले. त्यानुसार सर्वेक्षण न झालेल्या
पथविक्रेत्यांनी आज पासून १५ दिवसाचे आत महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समितीच्या कार्यालयांमध्ये किंवा राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान कक्ष, कैकाडी महाराज व्यापारी संकुल, १ ला मजला, माळीवाडा येथे लेखी स्वरुपात अर्ज करावा. ही शेवटची संधी असून या कालावधीत अर्ज आलेल्या पथविक्रेत्यांचेच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version