Home शहर अहमदनगर शहरातील अमेरिकन मराठी मिशन च्या जागेवर अनधिकृतपणे ताबा घेणाऱ्या गुंडांनवर पोलिस...

अहमदनगर शहरातील अमेरिकन मराठी मिशन च्या जागेवर अनधिकृतपणे ताबा घेणाऱ्या गुंडांनवर पोलिस अधीक्षक यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करावी- डि.जी. भांबळ

अहमदनगर दि.१२ जून
अहमदनगर शहरातील अमेरिकन मराठी मिशन च्या जागेवर अनधिकृतपणे ताबा घेणाऱ्या गुंडांनावर पोलिस अधीक्षक यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी संस्था पदाधिकारी यांनी केली आहे.

युनायटेड चर्च बोर्ड फॉर वर्ल्ड मिनिस्ट्रीज (क्लेरा ब्रुस गर्ल्स व बॉईज स्कुल) यांचे शैक्षणिक कामासाठी वापरले जाते. संपूर्ण मिळकतीस कंपाऊंड भिंत आहे. अशी परिस्थिती असतांना राजकीय पुढारी / पोकळीस्त खरेदीने झालेले तथाकथित तोतया मालक / बिल्डर माफिया व कब्जा ठोक गँग मार्फत रात्री-बेरात्री भाडोत्री गुंडाना हाताशी धरून बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करुन, दहशत निर्माण करून ताबा घेण्याचा अनाधिकृतपणे मिळकती मध्ये प्रवेश करून, गेटची कुलुपे तोडून मोठ मोठी पत्र्याचे शेड ३ ते ४ ट्रकमध्ये आणुन कायदा मोडून व हातात घेऊन ताबा घेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करणा-यावर व ज्या ऐतिहासिक मुलींच्या शाळेमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाईफुले आणि फातिमा शेख यांना शिक्षण घेऊन स्त्रीयांना शिक्षीत करण्याचे महान कार्य केले. त्या क्लेरा ब्रुस शाळेची मिळकत वाचविण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्य करणा-या संस्था, समाजसेवक, नगर सेवक, समाज बांधव व तमाम नागरिकांनी अल्पसंख्याक संस्थेस सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाने संस्थेस व संस्था चालक यांना संरक्षण द्यावे व गुंडावर मोक्का कायदया अंतर्गत कारवाई करावी व मिळकतीमध्ये अवैध प्रवेशास प्रतिबंध करावे.असे लेखी पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिले असल्याची माहिती, डि.जी. भांबळ यानी दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version