Home राज्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे मुंडे समर्थक संतापले...

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे मुंडे समर्थक संतापले कुठे टरबूज फोडले तर काही ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या अडवल्या

बुलडाणा दि.१२ जून
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून भाजपने आयात उमेदवारांना तिकिटे दिली. मात्र, ज्या स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढविला त्या मुंडे साहेबांच्या कन्या , माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारल्याचा आरोप मुंडे समर्थकांनी केला आहे.

तसंच पंकजा मुंडे यांना डावलल्यामुळे आक्रमक झालेल्या मुंडे समर्थकांनी आज बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे टरबूज फोडून निषेध केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

तर दुसरीकडे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा मुंडे समर्थकांनी ताफा बीड उस्मानाबाद सीमेवरती रोखण्याचा प्रयत्न केला.दरेकर यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version