HomeUncategorizedनगर शहरात धक्कादायक प्रकार... पौर्णिमेच्या मध्यरात्री अमरधाम मध्ये काय सुरू होत...

नगर शहरात धक्कादायक प्रकार… पौर्णिमेच्या मध्यरात्री अमरधाम मध्ये काय सुरू होत…

advertisement

अहमदनगर दिनांक 23 मे
अहमदनगर शहरातील अमरधाम मध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पौर्णिमेच्या मध्यरात्री एक तांत्रिक भगवे कपडे परिधान करून अमरधाम मध्ये कवट्या आणि इतर साहित्य घेऊन मंत्र तंत्र म्हणत विधी करत असल्याचे आढळून आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी मध्यरात्रीच्या पौर्णिमा सुरू झाल्यानंतर बारा वाजल्यानंतर एक भगवे कपडे घातलेला तांत्रिक नगर शहरातील अमरधाम मध्ये अग्नी पेटवून पूजा करत असल्याचं काही स्थानिक लोकांच्या लक्षात आले त्यांनी त्या ठिकाणी जवळ जाऊन पाहिले असता तांत्रिकासमोर हळदी कुंकू लिंबू आणि कवटी ठेवल्याचा आढळून आले त्याचबरोबर त्याच्या समवेत काही नागरिकही येथे उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी या तांत्रिकाला त्याबद्दल जाब विचारला मात्र त्या तांत्रिकाने स्थानिक नागरिकांना धुडकावत आपली पूजा चालूच ठेवली पौर्णिमेच्या मध्यरात्री ही पूजा सुरू असल्याने अजूनही अनेक लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याचं दिसून येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular