अहमदनगर दि.१७ सप्टेंबर
अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सिव्हील हाडको गणेश चौक येथील आकाश
गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की सिव्हील हडको परिसरात ओपन जिम समोर काही लोक आरडा ओरड करत असल्याची खबर तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर काही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एक जणआरडाओरडा करत होता पोलीस कर्मचारी शांत करत असताना आकाश गायकवाड म्हणाला तुम्ही इथे कशाला आले यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याला त्याचा राग येऊन त्याने पोलिसांना शिवीगाळ दमदाटी करुन त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने पोलिसांना मारहाण करु लागला.
त्यानंतर पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फोन करून अधिक कुमक बोलून घेतली मात्र या गडबडीत एक जण पळून गेला व आकाश गायकवाड याला पोलिसांनी धरून ठेवले होते. आकाश गायकवाड याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये राहुल शंकर भालेराव यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोड भागात पोलीस बंदोबस्तात असताना एक अधिकारी जखमी झाला होता मात्र हा अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या काठी मुळे जखमी झाल्याचं सांगण्यात येत असून याबाबत काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे अधिकारी जखमी झाल्याची चर्चा होत होती त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणातही चौकशी करण्याचे आदेश दिले होते.