अहिल्यानगर दिनांक ४ नोव्हेंबर
अहमदनगर शहर मतदार संघात महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाली असून शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्या मुळे निवडणुकीत मोठी रंगत आली आहे.
अनिल भैय्या राठोड विचार मंच शिवसेना समर्थित उमेदवार प्रा. शशिकांत गाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.नगर शहराच्या विकासासाठी परिवर्तन व्हावे म्हणून त्यांनी उमेदवारी कायम ठेवली असून
स्वच्छ प्रतिमा असलेले, सुसंस्कृत आणि शिक्षित उमेदवार म्हणून शहरातील मतदार याचा विचार करतील आणि मतदार परिवर्तन करतील असा विश्वास शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावरून अनिल भैय्या राठोड विचार मंच शिवसेना उमेदवार प्रा. शशिकांत गाडे हे उमेदवार असल्याच्या पोस्ट झळकल्या असून गाडे यांचे समर्थक पोस्ट वायरल करत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांची डोकेदुखी वाढणार आहे