अहमदनगर दि. १७ जुलै
नगर शहरातील पाईप लाईन रोड वरील एकविरा चौकात आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाल्याने अंकुश चत्तर हा मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आला होता.त्याच वेळी सात ते आठ जण त्या ठिकाणी चारचाकी गाडी मध्ये आले आणि त्या गाडीत असलेल्या नगरसेवक स्वप्निल शिंदे याने दिलेल्या चिथावणीवरुन अंकुश चत्तर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले होते. या घटनेनंतर जखमी अंकुश यास उपचारासाठी मॅक केअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
या घटने बाबत बाळासाहेब सोमवंशी, यांनी दिलेल्या तक्रारी वरुन तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये भादविक 307, 323, 324, 325, 326, 143, 147, 148, 149, 108 सह आर्म ऍ़क्ट 3/25 व म.पो.का.क. 37 (1)(3)/135, क्रि.लॉ.ऍ़.अ. 7 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी अंकुश चत्तर हा उपचारा दरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास 302 हे वाढीव कलम लावण्यात आला आहे.
ही घटना झाल्यापासून यातील आरोपी फरार झाले होते हे आरोपी शोधण्यासाठी तोफखाना पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या आरोपींच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, हेमंत थोरात, पीएसआय तुषार धाकराव, सोपान गोरे, सह्याक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, भिमराज खर्से, पोलीस कॉन्स्टेबलव बाळु खेडकर, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे तसेच सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बाळासाहेब मुळीक, सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, अतुल लोटके, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, विजय वेठेकर, विश्वास बेरड, देवेंद्र शेलार, पोना/विशाल दळवी, संदीप दरदंले, फुरकान शेख, विशाल गवांदे, पोकॉ/रोहित येमुल, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, प्रशांत राठोड,अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करून राज्यातील विविध ठिकाणी रवाना केले होते
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कळलेल्या माहितीनुसार काळ्या रंगाची एमजी कंपनीची कार क्रमांक एमएच/16/सीएक्स/9393 मधुन आरोपी अहमदनगर, शेवगांव, पैठण, बिडकीन मार्गे वाशिमकडे गेल्याची माहिती मिळाली त्यानुसार मोबाईल आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करून
वाशिम येथील हॉटेल गुलाटी हॉटेल मधून स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके ,अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कु-हेवय,सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे यांना ताब्यात घेतले.तर इतर दोन आरोपी मिथुन धोत्रे याला जुन्नर येथील रांजणी गावातून अटक केली त्याच्याबरोबर एक अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून या सर्व आरोपींना आज न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे.
या प्रकरणातील आरोपी स्वप्निल शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनासह जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी कामात अडथळा अशा इतर कलमान्वये गंभीर स्वरुपाचे एकुण सात गुन्हे दाखल आहेत
आरोपी अभिजीत बुलाख हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे तर आरोपी सुरज कांबळे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द गंभीर दुखापतकरणे, जिवे मारण्याची धमकी देणे, आर्म ऍ़क्ट व इतर कलमान्वये एकुण -6 गुन्हे दाखल आहेत
आरोपी महेश कु-हे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न असा गंभीर स्वरुपाचा एक गुन्हा दाखल आहे
आरोपी मिथुन धोत्रे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे चोरीचा एक गुन्हा दाखल आहे