HomeUncategorizedअंकुश चत्तर खून प्रकरणातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यावर अखेर लागला...

अंकुश चत्तर खून प्रकरणातील आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याच्यावर अखेर लागला मोकका..

advertisement

अहमदनगर दि.१५ डिसेंबर

अंकुश चत्तर खून प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेल्या
स्वप्निल रोहिदास शिंदे याच्यावर मोका अन्वय कारवाई करण्यात आले असून मोक्याचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे.

१५ जुलै रोजी रात्री अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. याप्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे राजू फुलारी, अरुण पवार यांना अटक केली होती. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली होती.

या प्रकरणाचा तपास आधी दुकाना पोलीस स्टेशन करीत असतानाच हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. स्वप्निल शिंदे याच्यावर याआधी अनेक गंभीर होण्याची नोंद असल्याने त्याच्या विरोधात मोका अन्वये कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून भाजपच्या नगरसेवकावर अखेर मोक्कका अंतर्गत कारवाई झाली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular