Homeजिल्हापाथर्डी मधील मोहटादेवीच्या श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या नावांची घोषणा

पाथर्डी मधील मोहटादेवीच्या श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या नावांची घोषणा

advertisement

अहमदनगर दि.२४ नोव्हेंबर-

पाथर्डी तालुक्यातील मोहटे येथील श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या नावांची घोषणा श्री मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी जाहीर केले.

श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त मंडळाच्या १० जागांसाठी २७६ अर्ज दाखल झाले होते. देवस्थानच्या १५ विश्वस्तांपैकी-पाच विश्वस्त हे पदसिद्ध अधिकारी असून, पाच विश्वस्त मोहटे गावातून, तर पाच विश्वस्त राज्यभरातून निवडले जातात. मोहटे गावातील पाच जागांसाठी ८९, तर राज्यातील पाच जागांसाठी १८७ अर्जप्राप्त झाले होते. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ २४ नोव्हेंबरला संपुष्टात आला आहे. नवीन विश्वस्त नेमणुकीबाबत ३० ऑगस्ट २०२२ रोजी प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते, तर अर्ज दाखल करण्याची मुदत १० सप्टेंबरपर्यंत होती.

श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे नूतन विश्वस्त मंडळ ( सन 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी)
मोहटे गावातील (पाच) विश्वस्त
श्री शिशिकांत रामनाथ दहिफळे
श्री बाळासाहेब किसन दहिफळे
सौ प्रतिभा नितीन दहिफळे
श्री विठ्ठल अजिनाथ कुटे
श्री अक्षय राजेंद्र गोसावी

मोहटे गाव व्यतिरिक्त भाविकांमधून (पाच) विश्वस्त
श्री श्रीराम गंगाधर परतानी पुणे
ऍड श्री कल्याण दगडू बडे औरंगाबाद
डॉ श्री श्रीधर मधुकर देशमुख पाथर्डी
श्रीमती अनुराधा विनायक केदार पाथर्डी
ऍड श्री विक्रम लक्ष्मण वाडेकर अहमदनगर

निवड झालेल्या विश्वस्तांचे श्री मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा अहमदनगरचे जिल्हा न्यायाधीश- १ श्री सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा पदसिद्ध विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक अहमदनगर श्रीमती सुवर्णा माने, पाथर्डीचे तहसीलदार श्री श्याम वाडकर, प्रभारी गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे यांनी अभिनंदन केले , अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular