Homeक्राईमलाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा आहे कळताच पोलिसाने व्हाईस डिव्हाईस घेऊन ठोकली...

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा आहे कळताच पोलिसाने व्हाईस डिव्हाईस घेऊन ठोकली धूम ; नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रकार

advertisement

अहमदनगर दि.१७ फेब्रुवारी

अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार, एकनाथ पंडित निपसे हा लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे डिजिटल व्हाइस रेकॉर्डर घेऊन पळून गेल्याची घटना घडली

काही दिवसापूर्वी रेशनचे धान्य खाजगी दुकानात विकत असल्याचा तक्रारवरून एका व्यापाऱ्याला पोलिसांनी अटक केली होती या व्यापाऱ्याने आपण हा तांदूळ नगर शहरातील दुसऱ्या दुकानदाराकडून विकत घेतला असल्याचे सांगितले होते त्यानुसार हा तपास करणारा पोलीस हवालदाराने त्या छोट्या दुकानदारास बोलवून घेऊन जर अटक करायची नसल्यास पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत त्या दुकानदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची खात्री करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार दुकानदाराकडे डिजिटल व्हाईस रेकॉर्ड देऊन पुन्हा पोलीस हवालदार एकनाथ निपसे यांच्याकडे खात्री करण्यासाठी पाठवले हवालदार निपसे याने यावेळी सर्व बोलणं झाल्यानंतर त्याला शंका आली म्हणून त्याने त्या दुकानदाराची पोलीस स्टेशनमध्ये झडती घेतली त्या झडतीमध्ये त्याला दुकानदाराच्या खिशामध्ये ठेवलेले डिजिटल व्हॉइस रेकॉर्ड सापडले आणि त्याला खात्री झाली की आपल्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आहे आणि हवालदार निपसे याने डिजिटल व्हाईस रेकॉर्ड घेऊन पोलीस स्टेशन मधून धूम ठोकली या प्रकरणी एकनाथ पंडित निपसे या पोलीस हवालदारावर कोतवाली पोलीस ठाण्यात लाचेची मागणी करणे, व्हाइस रेकॉर्डर बळजबरीने हिसकावून घेऊन जाऊन पुरावा नष्ट करणे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 प्रमाणे लाच लुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हवालदार निपसे हा अध्यापही फरार असून कोतवाली पोलिसांसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस त्याचा तपास करत आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular