Homeशहरशहरातील मशिदीवरील भोंग्यांचे ध्वनी प्रदूषण त्वरित थांबवा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने...

शहरातील मशिदीवरील भोंग्यांचे ध्वनी प्रदूषण त्वरित थांबवा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने अप्पर पोलीस  अधीक्षकांना निवेदन. दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचे दिवस परीक्षेचे दिवस सुरू आहेत – सुमित वर्मा

advertisement

अहमदनगर -दि.१६ फेब्रुवारी
शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या मशिदीतून न्यायालयाने आखून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात दिवसांतून ५ वेळा मोठ मोठयाने अजान दिली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या डेसिबल च्या मर्यादा आणि नियम आखून दिलेले आहेत त्या शासनाकडून तपासल्या गेल्या तर सर्वच मशिदींवर कारवाई होईल.
सध्या १० वी १२ वी विद्यार्थ्यांचे परिक्षेचे दिवस सुरू आहेत, विद्यार्थ्यांना या महा गोष्टींचा नाहाग त्रास होत आहे. शैक्षणिक दृष्ट्या हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत अश्या काळात तरी संबंधितांनी नियमात रहायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडे अनेक विद्यार्थी आणि खाजगी क्लासेस च्या लोकांनी तक्रारी केल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकं या मशिदींवरील भोग्यांच्या आवाजाबाबत काही बोलू शकत नाही याचा ही मंडळी गैरफायदा घेत आहे.जसे काही अजान ची स्पर्धा लागलेली आहे अश्या पद्धतीने गोंगाट करतात हे योग्य नाही.
एकाच भागात १० मशिदींचा एकाच वेळी तेही दिवसांत ५ वेळा जोरात आवाज होत असेल याची कधी तरी चौकशी करून कारवाई केल्याशिवाय ही मंडळी सुधारणार नाही. किती मशिदींनी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत हे देखील तितकेच महत्त्वाचे. कायद्याचा धाक सर्वांना समान असला पाहिजे हिंदू बांधवांच्या कोणत्या मिरवणूका आल्या की तिथे डेसिबल मशिन घेऊन अधिकारी येतात पण पण हे अजान मोठया आवाजात चालतात तेव्हा का कारवाई केली जात नाही? विशिष्ट पंथाच्या लोकांसाठी अजान आहे तर याचा इतर धर्मीयांना त्रास का ? ३६५ दिवस x ५ वेळा म्हणजे १६२५ वेळा हे मोठ मोठ्याने अजान देऊन इतरांना त्रास देण्यात काय अर्थ आहे? नियम आखून दिले आहेत तर याची अंमलबजावणी पण झालीच पाहिजे. प्रशासनाचा धाक नसला की राजकीय हस्तक्षेप करावा लागतो आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या नोटीसा आम्हा लोकांना दिल्या जातात त्या आधीच प्रशासनाने हे भोंगे बंद करावे अन्यथा हनुमान चालीसाचा प्रयोग आम्ही पुन्हा सुरू करू. असा इशारा महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, सचिव डॉ. संतोष साळवे, महिला जिल्हाध्यक्षा ॲड.अनिता दिघे, शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे, स्वप्निल वाघ, प्रकाश गायकवाड, प्रवीण गायकवाड, प्रमोद ठाकूर, दीपक मगर, अभिजीत बेरड, तेजस भिंगारे, राहुल वर्मा, अभिषेक कलमदाने आदींसह उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular