अहमदनगर दि.२६ सप्टेंबर
शिर्डीत पंजाबचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सापडल्यावर शिर्डीच्या सुरक्षेच्या प्रश्नाने पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. (Ahmednagar Police) याच अनुषंगाने सुरक्षेचा आढावा घेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी हॉटेल व्यावसायिक चालक मालक यांची बैठक घेत आदेश दिले होते. हॉटेल व्यवसायिकांच्या बैठकीत सक्त सूचना देण्यात आल्या होत्या आहेत.नगर जिल्ह्यात कोणत्याही ओळखपत्राशिवाय रूम मिळत असल्याचे माहिती मिळाल्यास कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले होते.
रूम देताना ओळखपत्र व रजिस्टरमध्ये नोंद केल्याशिवाय रूम दिल्यास 144 सी आर पी एफ कलम तसेच आदेशाप्रमाणे 188 नुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे नगर जिल्ह्यातील हॉटेल व्यासायिकांचे धाबे दणाणले होते. मात्र तरीही काही लॉज मालक सर्व नियमांचे उल्लंघन करून रूम देताना ओळखपत्र व रजिस्टर मध्ये नोंद न करता रूम देत असल्याचा प्रकार नगर शहरात वडकीस आला आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने (Anti-terrorist squad)
शहरातील लॉजची तपासणी करून नोंदवही आणि ओळखपत्र बाबत माहिती घेतली असता लॉजची रूम भाड्याने देताना प्रवाशांकडून ओळखपत्र न घेता त्यांना लॉजमध्ये प्रवेश दिल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी माळीवाडा भागातील पुनम लॉजिंगचा चालक मोहनसिंग हरनामसिंग वधवा आणि भारत भुवन लॉजिंगचा चालक पुष्करलाल रामेश्वरलाल साल्वी (वय 24, रा. राजस्थान) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.फौ. मियाँ पापाभाई पठाण यांच्या फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने दहशतवादी विरोधी पथकाकडून खबरदारी घेण्यात येत आहेत (Accordingly, precautions are being taken by the anti-terrorist squad)