Homeक्राईमयुवा उद्योजकाचे अपहरण करून मारहाण करणारा निखिल राजकुमार लुणे फरार..गावडे कुटुंबीय भयभीत.....

युवा उद्योजकाचे अपहरण करून मारहाण करणारा निखिल राजकुमार लुणे फरार..गावडे कुटुंबीय भयभीत.. आरोपीस लवकरात लवकर अटक करावी पोलिसांकडे मागणी…

advertisement

अहिल्यानगर दि.18 जानेवारी
युवा उद्योजकला मारहाण करून अपहरण करणारा आणि अवैधपणे सावकारकीचा गुन्हा दाखल झालेला
निखिल राजकुमार लुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला असून त्याला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा उद्योजक महेश गावडे यांचे वडील सुरेश गावडे यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देऊन सुरज गावडे यांनी आरोपी निखिल राजकुमार लुणे याला अटक करण्याची मागणी केली आहे. आम्ही सर्व गावडे कुटुंबीय भयभीत असून महेश गावडे यास अपहरण करून मारहाण केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून तर अवैध सावकार करण्याबाबतचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून निखिल राजकुमार लुणे हा फरार झालेला असून त्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी निवेदाद्वारे करण्यात आली आहे.

निखिल राजकुमार लुणे हा आडदांड वृत्तीचा असुन तो माझ्या मुलाला व माझ्या घरच्यांना पुन्हा एकदा त्रास देऊन मारहाण करु शकतो तो पैशेवाला असल्या कारणाने तो किंवा त्याच्या हस्तकामार्फत आम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular