Home शहर नगर शहरातील अशा टॉकीज चौक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा कधी ?

नगर शहरातील अशा टॉकीज चौक परिसरातील अतिक्रमणावर हातोडा कधी ?

अहिल्यानगर दिनांक १७ डिसेंबर

अहिल्यानगर शहरातील भर वस्तीत असलेल्या आशा टॉकीज चौकामध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमण होत आहेत आणि या अतिक्रमांना महापालिकेने नेहमीच अभय दिलेले आहे शहरातील सर्व ठिकाणी अतिक्रमण निघतात मात्र अशा टॉकीज चौक परिसरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या भिंती लगत असलेल्या अतिक्रमणांना कोणाचा वरदहस्त आहे हे समजायला तयार नाही.

या चौकात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले पानटपऱ्याची, चहाची दुकाने आणि इतर व्यवसायिकांनी थेट रस्त्यावरच टपऱ्या थाटल्या आहेत.अतिक्रमणधारकाने स्वतःची जागा असल्यासारखे या ठिकाणी दुकाने थाटली आहेत . यामुळे रहदारीला अडथळा होत असून या चौकात नेहमीच वर्दळ असते आणि या वर्दळीच्या चौकात अतिक्रमण धारकांनी रस्ता व्यापला आहे. तसेच या ठिकाणी अनेक मुजोर व्यवसाय असून जर या अतिक्रमणांमुळे ट्रॅफिक जाम झाली तर या ठिकाणी असलेले दुकानदार सामान्य नागरिकाला अरेरावी करून दमदाटी करतात त्यामुळे या ठिकाणी असलेले अतिक्रमण काढावे असे मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version