अहमदनगर- (सूथो)
1707 मध्ये अहमदनगरमध्ये भिंगार जवळ असलेल्या आलमगीर या ठिकाणी मुगल बादशहा औरंगजेबाचा मृत्यू झाला मात्र त्याच्या मृत्यूनंतर त्याचा इतिहास पुस्तकात वाचून अनेक पिढ्या मोठ्या झाल्या काही काळापर्यंत औरंगजेब हा इतिहासाच्या पुस्तकात होता. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षापासून तो पुन्हा पुस्तकातून बाहेर येऊन त्याने महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला आहे. औरंगजेब हा इतिहासाच्या पुस्तकातून लोकांच्या मेंदूपर्यंत पोहोचला आणि त्याचा जन्म झाला त्याला जन्म घालणारे आणि त्याचे उदत्तीकरण करणारे दोघेही सर्व समाजाचे शत्रूच म्हणता येईल.
औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा वाद सुरू असताना सुरुवातीला औरंगजेबाचा फोटो झळकला आणि तिथून पुढे औरंगजेब हा इंस्टाग्राम, व्हाट्सअप स्टेटस आणि फेसबुक वर झळकू लागला.
आणि त्यानंतर महाराष्ट्र मध्ये या फोटोवरून चांगलाच वाद सुरू झाला दोन समाजामध्ये धार्मिक तेढ उत्पन्न होईल आणि त्यावरून दंगली पेटल्या गेल्या शहर, गाव बंद होऊ लागले मात्र औरंगजेबाच्या समर्थनार्थ काही टाळकेच पुढे आलेले दिसले लाखो जन समुदायाच्या समाजात बोटावर मोजण्याचे टाळके औरंगाबादचा उदो उदो आणि उदत्तीकरण करत असताना संपूर्ण समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. मात्र समाजाने सुद्धा अशा प्रवृत्ती विरोधात आता रस्त्यावर उतरले पाहिजे कारण चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालने हाही एक अपराध आहे.
औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला. हा इतिहास माहिती नसणारे चार टाळके औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवतात आणि दोन समाजामध्ये तेढ उत्पन्न होईल असे कृत्य करतात विशेष म्हणजे आपला कायदा ही अशा लोकांना लगेच जमिनीवर सोडतो कारण कायद्याच्या मते हा अपराध अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे. मात्र अशा कृत्यामुळे दोन समाजातील लोकांचं एकमेकांकडे संशयाने पाहणे दंगली होणे आणि त्यामध्ये गोरगरिबांचे नुकसान होऊन शहर आणि गाव बंद होणे यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असतानाही यावर राजकारण करून काही राजकीय मंडळी पोळी भाजण्याचं काम करतात हे देशासाठी अत्यंत विघातक आहे.
छत्रपती शिवराय किंवा स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे संभाजी राजे यांनी त्या औरंगजेबाचे महाराष्ट्रात झालेले युद्ध त्याकाळी हजारो सैन्याची फौज घेऊ नये औरंगजेब महाराष्ट्राची कणभर भूमीही जिंकू शकला नाही हा इतिहास आहे कपट करून संभाजी महाराजांना पकडून त्यांचा छळ केला होता मात्र शेवटपर्यंत संभाजी महाराज औरंगजेबापुढे झुकले नाही त्याच महाराष्ट्रात औरंगजेबाचे उद्दातीकरण कदापिही कोणीही सहन करू शकणार नाही मात्र इतिहास हे सांगतोय की महाराष्ट्राचा कणभर जमिनीची औरंगजेबाला जिंकता आली नाही तो औरंगजेब पुन्हा एकदा जन्म घेऊन फोटोद्वारे महाराष्ट्रात दंगली पेटवू पाहतोय मात्र सुज्ञ लोकांनी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून आणि प्रत्येक धर्मातील लोकांनी अशा चुकीच्या गोष्टीला पाठीशी न घालता त्या प्रवृत्तीला जागीच ठेचल पाहिजे त्या विरोधात रस्त्यावर उतरणे गरजेचे आहे नाहीतर स्वतःच्या क्षणिक आणि आर्थिक फायद्यासाठी हे समाजकंटक विविध फोटो घेऊन रस्त्यावर उतरतील आणि पूर्ण समाज बदनाम होईल त्यामुळे आता शहाणे होण्याची गरज आहे स्वतःच्या क्षणिक पाण्यासाठी आणि राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कोण कोणाच्या माध्यमातून औरंगजेबाला जन्माला घालतोय हे समजून घ्या आणि या औरंगजेबापासून दूर राहा कारण इतिहास बदलणार नाही आणि इतिहास बदलण्याच्या नादात दोन समाजातील तेढ वाढत जाऊन संपूर्ण समाज व्यवस्था उध्वस्त होऊन जाईल त्यामुळे अशा प्रवृत्ती पासून सावध होणे ही काळाची गरज आहे.
यापुढे जाऊनही जी प्रवृत्ती औरंगाबादचे उद्दातीकरण करत आहे त्यांच्या सर्वच गोष्टी तपास यंत्रणेने तापासण्याची गरज आहे मग त्यांच्या बँक खात्याच्या डिटेल पासून ते त्यांच्या फोन कॉल पर्यंत सर्व गोष्टी तपासून पाहिल्या तर नक्कीच यातून काही वेगळे बाहेर पडण्याची शक्यता आहे.