Homeशहरबँका, पतसंस्थेत घोटाळे करून घोटाळेबाज संचालक रुबाबात राजकीय व्यासपीठावर तर ...

बँका, पतसंस्थेत घोटाळे करून घोटाळेबाज संचालक रुबाबात राजकीय व्यासपीठावर तर स्वकष्टाची कमाई ठेवी घेऊन ठेवीदार रस्त्यावर.. संपदा, रावसाहेब पटवर्धन पतसंस्था आणि नगर अर्बन बँक ठेवीदारांची कैफियत..

advertisement

अहमदनगर दि.६ जानेवारी
बँका पतसंस्था यांच्या माध्यमातून फसवल्या गेलेल्या अनेक ठेवीदारांना आता बँकेत चकरा मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही अनेकांची स्वप्न या बंद झालेल्या बँका आणि पतसंस्थांमुळे उध्वस्त झाली आहेत. अनेक स्वप्न रंगवून ठेवीदार आपले पैसे ठेव म्हणून सुरक्षित असलेल्या बँका आणि पतसंस्थांमध्ये ठेवत असतो अपवाद काही ठेवीदार असेही असतात की पतसंस्थांमध्ये व्याजदर जास्त मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवी ठेवण्याचे प्रमाणही काहीसे जास्त असते मात्र बऱ्यापैकी ठेविदार हे आपल्या मुलाबाळांसाठी मुलींच्या लग्नासाठी शिक्षणासाठी ठेवी ठेवून भविष्यात या ठेवींचा आपल्याला फायदा होईल यासाठी बँका आणि पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवण्याचा त्यांचा उद्देश असतो. मात्र बँक आणि पतसंस्था बुडली अथवा बंद पडली तर याचा सर्वात मोठा फटका हा ठेवीदारांना बसतो ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असतात मात्र ते वेळेवर न भेटल्यामुळे अनेक ठेवीदारांना बँका पतसंस्थेच्या दारात चकरा माराव्याच लागतात.

अहमदनगर शहरातील रावसाहेब पटवर्धन आणि संपदा पतसंस्था अशाच प्रकारे बंद पडल्या आहेत. मात्र या बंद पडलेल्या पतसंस्थामधील ठेवीदारांच्या ठेवी अजूनही मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत.सर्व कायदेशीर मार्ग अवलंबूनही ठेविदारांच्या नशिबी अजूनही चकरा माराव्या लागतायेत.

संपदा पतसंस्थेत 2011 मध्ये आर्थिक घोटाळा झाला. या घोटाळ्याला आता तेरा वर्ष झाले आहेत मात्र अजूनही अनेक ठेवीदार आपल्या ठेवी मिळवण्यासाठी झगडत आहेत. तर काही ठेवीदार मरण पावले आहेत. संपदा पतसंस्थेच्या 26 कोटी 61 लाख 65 हजार रुपयांची जबाबदारी 18 संचालकांवर मे 2015 ह्या वर्षी निश्चित करण्यात आली होती.वरील रक्कम जर 30 जून, 2015 नंतर संस्थेत भरली तर त्यावर 15% दराने व्याज भरावे लागेल. आज ही निश्चिती होऊन 8 वर्षांच्या वर कालावधी लोटला आहे. अजूनही संचालकांनी रक्कम भरलेली नाही. त्यामुळे अनेक ठेवीदारांना ठेवी मिळाल्या नाहीत ठेवी न मिळाल्यामुळे या धक्क्यातून अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अवसायक मंडळ आल्यानंतर थोडीफार वसुली सुरू
झाली होती अवसायक मंडळाकडे नोंद करणाऱ्या १९०० ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या चार टक्के
म्हणजेच ८० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते. नंतर नंद केलेल्या २५० ठेवीदारांना कोणतीही रक्कम मिळालेली नाही. २२०० ठेवीदारांनी त्यांच्या २२ कोटी रुपयांच्या ठेवींची अवसायक मंडळाकडे नोंद केली आहे.संपदा पतसंस्था डब्याईला आल्यानंतर गेल्या 13 वर्षापासून ठेवीदार अडचणीत आहेत. तत्कालीन घोटालेबाज संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणून ठेवी देण्याची मागणी ठेवीदार सातत्याने करत आहेत मात्र त्याला अनेक कायदेशीर अडचणी येत असल्यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ झाली आहे.

आजही अनेक ठेवीदार आपल्या ठेवी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत काही जिवंत आहेत तर काही वयोवृद्ध झाले आहेत तर काही मरण पावले आहेत. मात्र या घोटाळ्यातील पतसंस्थेतील संचालक मात्र दिमाखात फिरताना आणि विविध राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावतानाचे चित्र ठेविदारांनी पाहिल्यामुळे निविदारांच्या मनात चीड निर्माण झाली आहे.आमच्या कष्टाचे पैसे बुडवून या संचालक मंडळातील काही पदाधिकारी थेट राजकीय पुढाऱ्यांच्या शेजारी जाऊन बसत असल्यामुळे राजकीय पाठबळ असल्यामुळेच अशा लोकांची सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे पैसे लूबाडण्याची हिंमत होते का ? असा सवाल आता ठेकेदार उपस्थित करू लागले आहेत. संपदा पतसंस्था ही जिल्ह्यात नावाजलेली पतसंस्था होती त्यामुळे अनेकांनी आपले पैसे या पतसंस्थेत ठेवी म्हणून ठेवले होते.मात्र घोटाळे करून या पतसंस्थेचे घोटाळेबाज संचालक आज राजकीय व्यासपीठावर दिसू लागले आहेत हे विशेष.

त्याचप्रमाणे रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतही असाच प्रकार घडला असून रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे अनेक ठेवीदार आजही ठेवी मिळवण्यासाठी झगडत आहेत. त्याचप्रमाणे नगर अर्बन बँकेतही असाच प्रकार सुरू असून अर्बन बँकेच्या घोटाळ्यांचे अनेक पुरावे पोलिसांना सादर करूनही संचालक मंडळ अद्यापही खुलेआम राजकीय व्यासपीठावर उपस्थित राहून तुम्ही आमचं काहीच बिघडू शकत नाही असे ठेवीदारांना जणू काही चॅलेंज देत असल्याचा प्रकार नगर शहरात सुरू आहे. बँका पतसंस्थेत घोटाळे करून चोर घोटाळेबाज संचालक मंडळ राजकीय व्यासपीठावर तर कष्टाचे पैसे बँकेत ठेवायला देणारे ठेवीदार रस्त्यावर बसल्याचे चित्र सध्या नगर शहरात दिसून येत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular