अहिल्यानगर दिनांक 7 सप्टेंबर
१९ मे २००८ रोजी अशोक लांडे याच्या खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा लागून २०१८ पासून न्यायालयाने जमीन मंजूर केल्यानंतर काही वर्ष नगर शहरातील राजकारणातील प्रभावी असे भानुदास कोतकर यांना नगर जिल्ह्यात न्यायालयाने जाण्यास बंदी केली होती.कालांतराने आता ही बंदी उठवण्यात आली आहे. मधल्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. या काळातही भानुदास कोतकर यांच्या भूमिकेची चांगली चर्चा झाली होती. नगर शहरात प्रभावशाली राजकीय नेता म्हणून भानुदास कोतकर यांच्याकडे पाहिले जायचे. अहिल्यानगर महानगरपालिका म्हणजेच तत्कालीन अहमदनगर महानगरपालिका स्थापन करण्यामागे भानुदास कोतकर यांचा फार मोठा वाटा होता. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे आणि भानुदास कोतकर यांचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे भानुदास कोतकर यांनी प्रयत्न करून नगरपालिका विसर्जित करून अहमदनगर महानगरपालिकेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले होते. त्यानंतर संदीप कोतकर यांच्या रूपाने महानगरपालिकेचे तरुण महापौर त्यांच्या कामाचे आजही कौतुक होत आहे.

73 वर्षीय भानुदास कोतकर यांनी नगर शहरात पुन्हा एन्ट्री केली भानुदास कोतकर यांचे एकेकाळी नगर शहराच्या क्षेत्रात मोठं नाव होतं. राजकीय क्षेत्रात त्यांचा एक दबदबा राहिला आहे. आज पूर्वीसारखं नगर शहराचा राजकारण राहिलेले नाही. मात्र अजूनही केडगाव आणि नगर शहरात भानुदास कोतकर यांच्या नावाचा दरारा कायम आहे.
भानुदास कोतकर यांच्या नगरमध्ये येण्याच्या वेळेकडे राजकीय जाणकार लक्ष वेधत आहेत. पुढच्या काही महिन्यात अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याआधी भानुदास कोतकर हे नगर शहरात आल्यामुळे. केडगावातील मतदारांवर प्रभाव टाकणार का? अशी चर्चा आहे. केडगाव हा भानुदास कोतकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर यांनी सातत्याने या भागातून महानगर पालिकेची निवडणूक जिंकली आहे.
केडगाव ने दिली नेहमीच कोतकर कुटुंबियांना साथ
भानुदास कोतकर हे स्वतः नगरसेवक राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांचे चिरंजीव संदीप कोतकर, सुवर्णाताई कोतकर, यांच्यासह कोतकर यांचे अनेक शिलेदार केडगाव भागातून सतत निवडणूक जिंकत आहेत. केडगाव हा भानुदास कोतकर यांचा बालेकिल्ला आहे. मात्र नवीन झालेल्या प्रभाग रचनेत अनेक प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. यामध्ये केडगाव मध्ये सुद्धा प्रभागांची मोडतोड झाल्यामुळे आता भानुदास कोतकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
राजकीय गणितं काय?
भानुदास कोतकर हे पूर्वश्रमीचे काँग्रेसचे आणि विखे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जायचे लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या मागे आपली ताकद उभा केली मात्र आता सध्या तरी भानुदास कोतकर यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही सध्याच्या राजकारणात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दोन गट पडले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत कोतकरांची साथ कोणाला मिळते? याची उत्सुक्ता आहे. कारण भानुदास कोतकर हे आता या भागात अनेक वर्षानंतर सक्रीय झाले आहेत , तसेच नगर शहरातही काही ठिकाणी त्यांचा प्रभाव काही प्रमाणात आहे. यंदाची निवडणूक नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या सर्वांसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केडगाव सह नगर शहरात भानुदास कोतकर हे महायुतीला साथ देणार की, महाविकास आघाडीला यावर केडगाव सह नगर शहरातील अनेक राजकीय गणितं अवलंबून आहेत.