Home शहर .आमदार संग्राम जगताप यांचे शिलेदार आपला माणूस मयूर बांगरे प्रभाग क्रमांक 17...

.आमदार संग्राम जगताप यांचे शिलेदार आपला माणूस मयूर बांगरे प्रभाग क्रमांक 17 मधून मैदानात…

नगर दिनांक 3 सप्टेंबर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरात आता मोर्चे बांधणी केली जातेय. यादरम्यान आज प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली गेली आहे.

प्रभाग रचना जाहीर: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज (3 सप्टेंबर 2025) प्रसिद्ध झाली आहे.

हरकती आणि सूचना: नागरिक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना नोंदवू शकतात,

Oplus_131072

महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या इच्छुकांचे नशीब आज उजाडणार आहे. सर्व पक्षांचे लक्ष लागलेली प्रारूप प्रभागरचना आज प्रसिद्ध झाली आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून आमदार संग्राम जगताप यांचे शिलेदार आणि हक्काचा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे मयूर बांगरे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले असून अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 17 मधील परिसरात आपल्या हक्काचा माणूस म्हणून मयूर बांगरे यांनी नगरसेवक नसतानाही नागरिकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक होऊन नागरिकांची उरलेली कामे मार्गी लावण्यासाठी यावर्षी मयूर बांगरे हा हक्काचा माणूस निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे.

असा असेल प्रभाग क्रमांक सातारा

व्याप्ती हॉटेल यश ग्रांड, इलाक्षी शोरूम, कायनेटिक चौक परिसर, खैरे चाळ, प्रियांका कॉलोनी, पांजरपोळ, सुखकर्ता कॉलोनी, अंबिका विद्यालय, केडगाव देवी परिसर, इंदिरा नगर, हनुमान नगर, एकता कॉलोनी, मोहिनी नगर, पाच गोडाऊन परिसर, लोंढे मळा, दुधसागर सोसायटी, एफ.सी.आय. गोडाऊन, तारा बाग कॉलोनी, साई श्रुती पार्क.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version