Home शहर निर्भया निकालाचे औचित्य साधून भरोसा सेलच्या वतीने 18 शाळा आणि कॉलेजमध्ये जनजागृतीपर...

निर्भया निकालाचे औचित्य साधून भरोसा सेलच्या वतीने 18 शाळा आणि कॉलेजमध्ये जनजागृतीपर उपक्रम

अहमदनगर दि.१६ डिसेंबर

अहमदनगर शहरातील भरोसा सेलच्या निर्भया पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नगर शहरातील विविध शाळा आणि कॉलेजमध्ये अनोखा उपक्रम राबवला असून भरोसा सेलच्या सपोनि पल्लवी देशमुख यांच्या सहभागाने निर्भया निकालाचे औचित्य साधून शुक्रवारी निर्भया पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आठ टीम तयार करून शहरातील विविध भागातील अठरा शाळा व कॉलेज येथे जाऊन जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमादरम्यान कार्यक्रमात चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमात अहमदनगर शहरासह भिंगार परिसरातील
प्रियदर्शनी पब्लिक स्कूल भिंगार , भाऊसाहेब फिरोदिया कॉलेज/ हायस्कूल,पार्वतीबाई डहाणूकर विद्यालय, राघवेंद्र स्वामी विद्यालय, अंबिका विद्यालय केडगाव, कन्या विद्यालय,७दादासाहेब रूपवते,संबोधी कॉलेज, किशोर संस्कृत संवर्दिनी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केडगाव, मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान ,डॉन बॉस्को विद्यालय, जगदंबा महाविद्यालय केडगाव,भाग्योदय विद्यालय केडगाव,ना ज पाऊलबुधे विद्यालय,श्रीराम चौक,बजरंग विद्यालय सावेडी, समर्थ विद्यालय सावेडी,समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली संजीवनी इन्स्टिट्युट भिंगार, अहमदनगर च्या शाळांनी कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी (गृह) यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमा मध्ये हेड कॉन्स्टेबल शेख ,हेड कॉन्स्टेबल इंगवले, हेड कॉन्स्टेबल आव्हाड, कॉन्स्टेबल पोकळे ,पोलीस नाईक कोळेकर, महिला हेड कॉन्स्टेबल दिघोळे महिला पोलीस नाईक विधाटे, महिला पोलीस नाईक औटी, महिला पोलीस नाईक तोरडमल, महिला पोलीस नाईक काळे ,महिला पोलीस नाईक ढवळे ,महिला पोलीस कॉन्स्टेबल पारधे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ठोंबे ,महिला पोलीस कॉन्स्टेबल मोहरे ,महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहकले, महिला पोलीस कॉन्स्टेबल खेडकर ,महिला पोलीस कॉन्स्टेबल माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुरी आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला होता

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version